
सोलापूर – सोलापूर येथील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून १ मेपासून सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सिअस झाले आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळी १० ते दुपारी ५ पर्यंत घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. प्रचंड उकाड्याने नागरिकांना कामे करणेही अशक्य होत आहे. भूमीतील पाणीपातळी खालावली असून नदी, तलाव, ओढे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस झाला; मात्र त्याने लाभ न होता उलट उष्णेतत वाढ झाली !
कोल्हापूर ४० अंश सेल्सिअसकडे !कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून सांगली-कोल्हापूर शहरांमध्येही तापमानात प्रचंड वाढ होते. कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सिअसकडे जात आहे. एकीकडे उन्हाळा, तर दुसरीकडे मतदानाचे शेवटचे काही दिवस असल्याने राजकीय वातावरणही तप्त झाले आहे. |
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !