नाशिक येथे पैसे वाढवून देण्याचे आमीष दाखवून बनावट नोटा देणार्‍याला अटक

नाशिक – ७ लाख रुपये दिल्यास त्याची तिप्पट रक्कम देण्याचे आमीष मोहिज फिदारी सैफी (वय ५३) याने दाखवले होते. लाखो रुपये लंपास करणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तेजस उपाख्य बंटी सुरेश वाघ असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका व्यक्तीला ११ मार्च २०२२ या दिवशी ७ लाखांच्या बदल्यात २३ लाख रुपयांचे आमीष दाखवून त्याच्याकडील पैसे चोरण्यात आले होते. संशयित तेजस पळून जात असतांना पाठलाग करून त्याला कह्यात घेतले. त्याच्या घरझडतीत पोलिसांना पाचशे, दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या खेळण्यातील नोटांचे १५७ बंडल मिळाले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.