पुणे – रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेतल्यानंतर उर्वरित रक्ताच्या नमुन्यांच्या ट्यूब जुन्या कात्रज घाटात टाकून देणार्या एन्.एम्. हेल्थकेअर सर्व्हिसेस या लॅब व्यावसायिक आस्थापनावर महापालिकेने कारवाई केली आहे. संबंधित आस्थापनावर १ लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करत संबंधित जैव वैद्यकीय कचरा तात्काळ उचलण्यास भाग पाडण्यात आले.
कात्रज येथील जुन्या घाटात रक्त तपासणीच्या ट्यूब भरलेली पोती उघड्यावर टाकून देण्यात आली होती. हा प्रकार पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले यांना समजला. त्यानंतर या प्रकाराविषयी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. संबंधित तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी संबंधित आस्थापनाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले, तसेच भविष्यात सार्वजनिक ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा टाकू नये, अशी सक्त ताकीद संबंधित आस्थापनाला दिली.