रत्नागिरी – जिल्हा उद्योजक फेडरेशनच्या वतीने येथील डिलाईट इंडस्ट्रीजचे उद्योजक श्री. अनिल देवळे यांना श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. चिपळूण येथे बहाद्दुरशेख नाका येथील सहकार भवनात ३० जून या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. श्री. अनिल देवळे हे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक असून नियमितचे जाहिरातदारही आहेत.
रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री यांच्या वतीने प्रतिवर्षी उद्योजक पुरस्कार अंतर्गत जीवनगौरव सन्मान दिला जातो. त्यानुसार यावर्षी विविध उद्योजक आणि आस्थापनांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी येथील मत्स्य उद्योजक दीपक गद्रे, सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कारामध्ये वाशिष्ठी मिल्कचे प्रशांत यादव, सी.एस्.आर्. पुरस्कारामध्ये घरडा केमिकल कंपनी, जागतिक उद्योजक पुरस्कार अंतर्गत स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. चे नीलेश चव्हाण आणि जिल्हा उद्योजकता पुरस्कार डिलाईट इंडस्ट्रीज प्रा. लि. रत्नागिरीचे अनिल देवळे यांना घोषित करण्यात आला होता.