मुंबई, १ जुलै (वार्ता.) – हरितक्रांतीचे जनक, बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची १ जुलै या दिवशी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने दिवंगत वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी १ जुलै या दिवशी ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’ याद्वारे विधानसभेत केली. याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिवंगत वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याविषयी यापूवी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. त्यानुसार त्यांना हा पुरस्कार देण्याविषयी पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल.