पंढरपूर – आषाढी यात्रेसाठी येणार्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून देण्यासाठी या वर्षी मंदिर समितीने बुंदीचे ११ लाख लाडू बनवण्यास प्रारंभ केला आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहून आवश्यकता वाटल्यास आणखी ५ लाख लाडू बनवण्याची सिद्धता केली आहे, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. विठुरायाचा प्रसाद भाविक आपल्या घरी घेऊन जातात. भाविकांना दिला जाणारा लाडू स्वादिष्ट करतांना आरोग्याच्या दृष्टीनेही सर्व नियम पाळण्यात येत आहेत.
आषाढी एकादशीला बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून खाता येत नसल्याने ५ लाख राजगिर्याचे लाडू बनवण्याचेही कामही चालू आहे.