छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीला भ्रमणभाषवर तलाक देणार्‍या पतीसह ७ जणांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

छत्रपती संभाजीनगर – घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आण, या मागणीसाठी विवाहितेचा छळ चालू होता. सासर्‍यांना दूरभाष करून पतीने पत्नी रुखसाना सुफियान कुरेशी (२१ वर्षे) यांना तलाक दिल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली. सध्या भोकरदन येथे माहेरी रहात असलेल्या विवाहिता रुखसाना यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पतीसह सासरच्या ७ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.