ठाणे जिल्ह्यातील डोह आणि ओहोळ आटले !

विकतच्या पाण्याचे मूल्य २ ते अडीच सहस्र रुपये

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील रणरणते ऊन, तीव्र बाष्पीभवन यांमुळे गावोगावचे पाण्याने भरलेले डोह आणि ओहोळ आटले आहेत. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. येथील डोहांना अनेक ठिकाणी नैसर्गिक झरे आहेत; पण उन्हामुळे त्यातील पाणी आटत आहे. भाजीपाल्यासाठीही पाण्याची सुविधा नसल्याने लागवड सुकलेली आहे. ग्रामस्थांना ट्रॅक्टर ट्रॉलीवरील टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागते. ३ सहस्र लिटर विकतच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना २ ते अडीच सहस्र रुपये मोजावे लागतात. धरणांनीही तळ गाठल्याने अनेक गावांना नळाद्वारे आठवड्यातून एक ते दोन वेळाच पाणी मिळते.