चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी  ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची ११ मतदारसंघांतील संख्या पुढीलप्रमाणे आहे – नंदुरबार ११, जळगाव १४, रावेर २४, जालना २६, संभाजीनगर ३७, मावळ ३३, पुणे ३५, शिरुर ३२, अहमदनगर २५, शिर्डी २०, बीड  ४१ अशी आहे. मतदारसंघांत नामनिर्देशन पत्र प्रविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात ३६९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यांतील ७१ उमेदवारांनी माघार घेतले आहेत.