बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – शहरातील बेस्टचे किमान ५ रुपये असलेल्या तिकिटामध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर वातानुकूलित गाड्यांच्या तिकिटामध्ये ४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. बेस्टमधून नियमित ३५ लाखांहून अधिक नागिरक प्रवास करतात. सध्या बेस्टकडे स्वत:च्या आणि ठेकेदाराच्या मिळून ३ सहस्र गाड्या कार्यरत आहेत.