मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांना समजावले !

ठाणे – जागावाटपापेक्षा देशात महाविकास आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला सिद्ध रहा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारांना सांगितल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. ठाणे येथील त्यांच्या घरी शिवसेनेच्या सर्व खासदारांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९ मार्चला बैठक झाली होती.
जागा वाटपावरून महायुतीत दुरावा नाही. प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल; असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याचे समजते. या बैठकीला खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, भावना गवळी, श्रीरंग बारणे, संजय मंडलिक उपस्थित होते. यातील गवळी, बारणे, मंडलिक यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे मानले जात आहे.
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्नीशमन विभागाच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !