मुंबई, १ मार्च (वार्ता.) – मागील वर्षी ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येणार्या निवृत्ती वेतनाची रक्कम २० सहस्र रुपये करण्याची मागणी केली होती, तसेच या योजनेचे निकष शिथिल करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र त्याप्रमाणे कारवाई झाली नव्हती. विधीमंडळात घोषित करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानभवनातील पत्रकार कक्षात आल्यावर विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो यांनी आक्रमकपणे या अन् अन्य प्रलंबित मागण्यांची मागणी केली. याविषयी अप्रसन्नता केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत’, अशी घोषणा केली.