तीन गुरूंच्या (टीप) छायाचित्रासमोर आत्मनिवेदन केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पाठवलेला गजरा एका साधिकेने आणून देणे आणि ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे !’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पत्र अर्धे लिहून झाले, तेवढ्यात एक साधिका माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तुला गजरा दिला आहे.’’स्थुलातून त्यांनी मला आध्यात्मिक लाभासाठी गजरा पाठवला होता.

मराठा आंदोलनावेळी प्रविष्ट ७९ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे मागे घेणार !

मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या वेळी जिल्ह्यामध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून ७९ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

दहिवडी (सातारा) येथील नामांकित महिला वैद्यांचा प्रथा परंपरा जपत केलेला अनोखा हळदीकुंकू समारंभ !

या समारंभाला गावातील सर्व महिलांना आमंत्रित केले होते. सहस्रो महिलांच्या उपस्थितीत हा समारंभ उत्साहात पार पडला.

अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या तिघांना अटक !

बांगलादेशातून १४ वर्षांच्या मुलीला फूस लावून भारतात पळवून आणणार्‍या आणि तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या तिघांना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

शिवजयंतीदिनी सातारा येथे फडकणार १०० फुटी भगवा ध्वज ! – छत्रपती उदयनराजे भोसले

हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

संगम माहुली (सातारा) येथील श्रीमंत येसूबाई यांची समाधी ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत येसूबाई यांची संगम माहुली येथील समाधी ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

यवतमाळ येथे ६ गोवंशियांची तस्करी पोलिसांनी रोखली !

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असूनही त्याची कार्यवाही होत नसल्याने गोवंशियांच्या तस्करीच्या घटना वारंवार घडत आहेत !

पुणे येथे ९५ ‘स्वराज्य रथां’ची मानवंदना आणि मिरवणूक !

‘शिवजयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्याकडून आयोजित केलेल्या ‘शिवजयंती’च्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये ९५ स्वराज्य रथांची मानवंदना दिली जाणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.