नाशिक – संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीनिमित्त झालेल्या शासकीय महापूजेस सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संत श्रीनिवृत्तीनाथांच्या मूर्तीचे पूजन केले. त्र्यंबकेश्वर नगर परिषद आणि संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान यांच्या वतीने प्रसाद देत सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्र्यंबकेश्वर येथील मंदिर स्वच्छता अभियानाचा प्रारंभ पालकमंत्र्यांनी केला. या वेळी शिवसेना आध्याित्मक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, मंदिर समिती अध्यक्ष श्री. नीलेश गाढवे, मंदिर समिती सचिव, विश्वस्त, कीर्तनकार उपस्थित होते.