याशनी नागराजन् या सातारा जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी !

याशनी नागराजन्

सातारा, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी या दिवशी राज्यशासनाच्या वतीने राज्यातील काही अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्यात आले. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे पुणे येथे मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात स्थानांतर करण्यात आले आहे. याशनी नागराजन् या वर्ष २०२० च्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या (आय.ए.एस्.) अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे, तसेच सध्या त्या पांढरकवडा येथील अदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून काम पहात होत्या.