पुणे – श्री रामललांच्या दर्शनासाठी पुणे येथून अयोध्येकडे निघालेल्या ‘आस्था स्पेशल ट्रेन’मध्ये ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने जळता भ्रमणभाष फेकला. अज्ञाताने जळता भ्रमणभाष रेल्वेच्या खिडकीतून आत फेकल्याने छाया काशीद या प्रवासी घायाळ झाल्या. यामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. ही घटना चिंचवड ते देहू रोड या रेल्वे स्थानकांमध्ये घडली आहे. ‘आस्था स्पेशल ट्रेन’ पनवेल स्थानकात आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बोगीत धाव घेत जळत्या भ्रमणभाषसह इतर सामान जप्त केले. रेल्वे पोलिसांनी घायाळ महिला प्रवासी आणि इतरांचे जबाब घेत हे प्रकरण पुणे रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.
संपादकीय भूमिकाही कृती साधी न समजता अशांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |