सुशासन निर्देशांकात रायगड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर !

रामनाथ (अलिबाग) – सामान्य प्रशासनाच्या वतीने ‘सुशासन निर्देशांक’ प्रसिद्ध करण्यात आला. यात रायगड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला असून गोंदिया दुसर्‍या, तर नाशिक तिसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासन पोचण्यासाठी सुशासन निर्देशांकासारखे उपक्रम राज्यशासनाच्या वतीने राबवण्यात येत आहेत. १० क्षेत्रांच्या कामगिरीच्या आधारावर मूल्यमापन करून प्रतिवर्षी हा सुशासन निर्देशांक सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सिद्ध केला जातो. त्यासाठी गुणांकनही दिले जाते.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या २०२३-२४ वर्षाच्या सुशासन अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या सुशासन निर्देशांकात ५२८ गुण रायगड जिल्ह्याला मिळाले आहेत, तर मुंबई उपनगर सर्वांत अल्प गुणांसह शेवटच्या स्थानी आहे.