राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन कसे हवे ?

‘नागरिकांच्या आध्यात्मिक उन्नतीवरून राष्ट्राच्या विकासाचे मोजमापन केले जायला हवे; कारण भौतिक विकास कितीही झाला आणि आत्मिक (किंवा नैतिक) विकास साध्य झाला नाही, तर त्या भौतिक विकासाला काय अर्थ आहे ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून होण्यासाठी नागरिकांनी आग्रही रहावे ! – अभिरूप न्यायालयात पार पडलेल्या संवादाचा सूर

मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली किंवा वाचली गेली पाहिजे. सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा, यासाठी मराठी भाषिक नागरिकांनी आग्रही रहावे, असे मत साहित्य संमेलनात पार पडलेल्या अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आले.

‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने प्रदीप माने ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित !

श्री. प्रदीप माने यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात ‘पाणी फाऊंडेशन’साठी मोठे कार्य केले. त्यांना ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरवण्यात आले असून सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे मोठे संघटन आहे.

एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या संदर्भातील घटनेची सखोल चौकशी गृहखाते करत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना सहस्रो वेळा घडल्या आहेत; पण त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही.

गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे मत फडणवीस यांच्यासमोर मांडले आहे

पुणे येथे अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर !

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोकाष्ठाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास वृक्षतोड थांबून, प्रदूषणही अल्प होईल. शहरातील स्मशानभूमीमध्ये गोकाष्ठाचा वापर करण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव ‘जय जिनेंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता.

वाहिन्यांचा इतिहासद्रोह !

श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी संत आहेत. भगवान दत्तात्रेय हे सनातन धर्मातील आराध्य दैवत आहे. सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर स्वामी समर्थांची मालिका चालू आहे.

असे शासनकर्ते हवेत !

उत्तरप्रदेश राज्यात जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली, तर ‘राम नाम सत्य है’ झालेच म्हणून समजा, अशी तंबी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्‍यांना दिली.