गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

मंत्री शंभूराज देसाई

मुंबई – भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. त्यांनी शिंदेंवर व्यक्तीशः आरोप केले आहेत. त्यामुळे आम्ही आमचे मत फडणवीस यांच्यासमोर मांडले आहे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. गणपत गायकवाड यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.