‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने प्रदीप माने ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित !

कोल्हापूर – विविध सामाजिक कार्याच्या माध्यमांतून ठसा उमटवणारे, भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे गावचे माजी सरपंच श्री. प्रदीप माने यांना ‘आदर्श फाऊंडेशन’च्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘पर्सन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ‘आदर्श फाऊंडेशन’च्या राज्यभरात विविध क्षेत्रांत काम करणार्‍या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. पुरण मलमे, श्री. प्रमोद पाटील, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या योजना पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

श्री. प्रदीप माने यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या काळात ‘पाणी फाऊंडेशन’साठी मोठे कार्य केले. त्यांना ‘आदर्श सरपंच’ म्हणून गौरवण्यात आले असून सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांचे मोठे संघटन आहे. केंद्रशासन आणि राज्यशासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीपर्यंत पोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. श्री. प्रदीप माने हे गोप्रेमी असून गोरक्षणाच्या कार्यात त्यांना नेहमी हातभार असतो.