भाजप आध्यात्मिक आघाडीद्वारे १५ फेब्रुवारीपासून राज्यभरात संत-महंतांचे मेळावे ! – आचार्य तुषार भोसले, प्रमुख, भाजप आध्यात्मिक आघाडी

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, तसेच वारकरी संप्रदाय, रामदासी, स्वामी समर्थ परिवार, तुकडोजी महाराज परिवार, गायत्री परिवार, श्री सेवक परिवारासह कीर्तनकार, प्रवचनकार, साधू-संत, महंताशी समन्वय आणि संपर्क ठेवण्यात आला आहे.

नागपूर येथे १२ हून अधिक महिलांचे व्हिडिओ चित्रीत करणार्‍या विकृत शिक्षकाला अटक !

आरोपी खापरे याने यापूर्वीही अनेकदा असे केले होते. त्याने सार्वजनिक शौचालयातील महिलांचे व्हिडिओ ध्वनीचित्रमुद्रित केले होते. त्याच्या भ्रमणभाषमध्ये असे ३० व्हिडिओ सापडले आहेत.

सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी एकत्र येणार ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

या वेळी ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात, भाजप आहे, तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात, स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही

१५ दिवसांच्या आत आईचे घर रिकामे करा !

नातेसंबंधांमधील ओलावा आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती असणारी आपुलकी नष्ट होत असल्यानेच अशा घटना घडतात ! यातून धर्मसंस्काराचे महत्त्व लक्षात येते !

नाशिक येथील गोदावरी आरतीसाठी १० कोटी रुपये मान्य !

१२ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी पूजन केल्यापासून तेथे स्नान आणि दर्शन यांसाठी भाविकांची गर्दी होत आहे. सिंहस्थ कालावधीत नियमित छोटेखानी स्वरूपात आरती केली गेली.

पतीला सर्पदंश करवणार्‍या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

खर्चासाठी पैसे देत नाही, या कारणावरून पत्नीने तिच्या साथीदारासह बोलावून पतीला बिअर पाजून त्याचा गळा दाबण्याचा आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला अन् त्यानंतर त्याला थेट गळ्याला विषारी सापाचा दंश घडवून आणला.

भिवंडी येथील लाचखोर साहाय्यक पोलीस निरीक्षक कह्यात !

अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

यज्ञाचे महत्त्व !

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पिंपरी (पुणे) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पा’च्या पडताळणीसाठी खासगी सल्लागार नको !

पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (एस्.टी.पी.) कार्यान्वित आहेत कि नाहीत, याची पडताळणी करण्यासाठी खासगी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.