
नागपूर – येथील एका शाळेच्या शिक्षकाला शौचालयाच्या खिडकीतून महिलांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करून त्याचा भ्रमणभाष संच जप्त केला आहे. मंगेश खापरे (३७ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. तो कासारपुरा येथील रहिवासी असून एका खासगी शाळेत कला शिक्षक होता. २७ ते २९ जानेवारी या कालावधीत नागपूर विद्यापिठात आयोजित ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ या औद्योगिक प्रदर्शनात तो सहभागी झाला होता. एका महिलेला त्याच्या कृत्याविषयी समजल्यावर तिने आयोजकांकडे त्याची तक्रार केली. त्याने महिलांचे १२ हून अधिक व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे.
आरोपी खापरे याने यापूर्वीही अनेकदा असे केले होते. त्याने सार्वजनिक शौचालयातील महिलांचे व्हिडिओ ध्वनीचित्रमुद्रित केले होते. त्याच्या भ्रमणभाषमध्ये असे ३० व्हिडिओ सापडले आहेत. ते त्याने वर्ष २०२२ मध्ये रेकॉर्ड केले होते. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला; पण स्थानिक न्यायालयाने त्याला जामीन मान्य केला. आरोपी मनोरुग्ण असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
संपादकीय भूमिका :समाजातील नैतिकतेचे किती अधःपतन झाले आहे, त्याचे हे उदाहरण ! |
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात