ठाणे, ३१ जानेवारी (वार्ता.) – खुनाच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र बनवतांना तक्रारदाराच्या मुलाला सहकार्य करण्यासाठी नारपोली पोलीस ठाणे येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बबन पवार (वय ३७ वर्षे) यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली २ लाख रुपयांची रक्कम तक्रारदाराकडून घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार यांना कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)