मनोज जरांगे यांना मुंबईत मैदानाची अनुमती देऊ नये ! – अधिवक्ता गुणवंत सदावर्ते

व्यावसायिक आस्थापने सांकेतिक भाषेत बंद पाडली जाऊ शकतात. शाळा बंद पडतील, पोषण आहार थांबतील. त्यामुळे आझाद मैदान, बिकेसी, शिवाजी पार्क अशा कुठल्याच मैदानात मनोज जरांगे यांना मोर्चासाठी अनुमती देण्यात येऊ नये……

रोहा (रायगड) येथील एका घरात शस्त्रसाठ्यासह जनावरांची शिंगे सापडली !

कारवाईत ५ बंदुका, १ रिव्हॉल्वर, ३९ काडतुसे, ३ तलवारी, ५ लोखंडी काती, १ चॉपर, ५ चाकू, १ किलो वजनाच्या दारूगोळ्याची २४ पाकिटे, शिशाचे छोटे गोळे या शस्त्रांचा समावेश आहे.

कन्नडसक्तीच्या विरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठी-कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालय उत्तरदायी !

शैक्षणिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार होणे, हे शिक्षण विभागाला लज्जास्पद !

नागपूरमधील शिवगर्जना ढोल-ताशा पथक अयोध्येत वादन करणार !

हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील.

भाजपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी अवमानकारक व्यक्तव्य केल्याविषयी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या चित्रास कोल्हापुरी चपलेने मारण्यात आले.

सरकार टिकल्यास मंत्रालयसुद्धा गुजरातमध्ये नेतील ! – आदित्य ठाकरे, आमदार

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘उद्याचा निर्णय घटनेनुसार असेल अशी आशा आहे आणि आम्ही सत्याच्या बाजूने असल्याने विजय आमचाच होणार आहे. आता ‘ईडी’, ‘सीबीआय’ यांची भीती वाटत नाही

कोल्हापूर-सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची संमती !

३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास २ सहस्र ३२८ कोटी रुपये जागतिक बँक देणार !

पुणे येथील कीर्तन महोत्सवातील व्यासपिठावर श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती !

मावळ तालुक्यातील विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

नवी मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

भगवान श्रीराम यांच्या आहाराविषयी विकृत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी नवी मुंबई विश्व हिंदु परिषदेच्या वतीने सीबीडी पोलीस ठाण्यात बेलापूर प्रखंड मंत्री स्वरूप पाटील यांनी केली.