काळाचौकी येथे साईबाबा शाळेत ८ सिलेंडरचे स्फोट !

येथे दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून वाचण्यासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

Gomantak Marathi Sahitya Samelan : चौफेर आघात होत असतांनाही गोव्याने वाङ्मयीन परंपरा सुरक्षित ठेवली ! – डॉ. सोमनाथ कोमरपंत

तत्कालीन शिक्षक, राष्ट्रप्रेमी साहित्यिक यांनी गोव्याबाहेरील मराठी साहित्य संमेलनातून देशभक्त निर्माण केले. शब्दांच्या शक्तीमुळे राष्ट्रजीवन घडते, याची प्रचीती आली.

शरद मोहोळ हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक !

शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री येथे धाड घातली. शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे आणि गुंड विठ्ठल शेलार यांची मुख्य भूमिका आहे.

‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने फेरअन्वेषण करावे ! – मिलिंद एकबोटे

श्री. मिलिंद एकबोटे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची कुख्यात गुन्हेगार अथवा गुंड म्हणून बाजू दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या हत्येची दुसरी बाजू प्रकाशात यायला हवी.

Goa CM : उद्योगांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पालट करण्याची सरकारची सिद्धता !

गोव्यातील युवक जी.पी.एस्.सी., यु.पी.एस्.सी. इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्ध्यांनी या परीक्षांकडे लक्ष दिल्यास ते रोजगारक्षम होतील.

हास्यास्पद सर्वधर्मसमभाव !

‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्‍या आंधळ्यासारखे असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सांगली येथे ‘मंगल कलश शोभायात्रा’ आणि ‘श्री तुलसीदास रामायण कथा वाचन’ यांचे आयोजन ! 

अयोध्या येथील श्रीराममंदिरात प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण महोत्सवाच्या निमित्ताने येथील श्री बालाजी मंदिर संचालित श्री सीताराम मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने ‘भव्य मंगल कलश शोभायात्रा’ आणि ४ दिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

भारतीय चित्रपटसृष्टीतील आणखी एका संघटनेने केला मालदीवमध्ये चित्रीकरणाला विरोध !

मालदीवच्या भारतविरोधी वृत्तीविषयी भारतीय चित्रपटसृष्टी (बॉलिवूड) सातत्याने आवाज उठवत आहे. ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने भारतीय चित्रपटसृष्टीला मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे.

१० कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त !

दुबईहून न्हावा-शेवा बंदरात आणलेल्या कंटेनरमधून १० कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने ही कारवाई केली.

उद्धव ठाकरे गटाची पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात याचिका !

‘एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना असल्या’चा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निकालच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.