काळाचौकी (मुंबई) – येथील साईबाबा नगरमधील साईबाबा शाळेत ८ सिलेंडरचे स्फोट झाले. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. येथे दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून वाचण्यासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. ‘कोरोना महामारीच्या काळात सिलिंडर आणि ऑक्सिजनचे सिलिंडर यांचा साठा शाळेत करण्यात आला होता. एका सिलिंडरच्या स्फोटामुळे इतर सिलिंडरचे स्फोट झाले’, अशी माहिती स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दिली.