महसूल गुप्तवार्ता संचलनालयाची कारवाई
मुंबई – दुबईहून न्हावा-शेवा बंदरात आणलेल्या कंटेनरमधून १० कोटी रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने ही कारवाई केली. त्यात ६७ लाख २० सहस्र सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटी आठ लाख रुपये आहे. कार्पेटच्या नावाखाली सिगारेटची तस्करी करण्यात येत होती.