भारतीय चित्रपटसृष्टीतील आणखी एका संघटनेने केला मालदीवमध्ये चित्रीकरणाला विरोध !

भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनंदनीय निर्णय !

‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल

मुंबई – मालदीवच्या भारतविरोधी वृत्तीविषयी भारतीय चित्रपटसृष्टी (बॉलिवूड) सातत्याने आवाज उठवत आहे. ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने भारतीय चित्रपटसृष्टीला मालदीवमध्ये चित्रपटांचे चित्रिकरण न करण्याचे आवाहन केले आहे. मालदीवच्या मुइज्जू सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय यांच्या विरोधात अपमानास्पद विधाने केल्यानंतर आणि भारतीय सैन्यदलाला मालदीवमधून हटवण्याची मागणी केल्यानंतर हे आवाहन करण्यात आले आहे.

‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल म्हणाले की, मालदीव सरकारने भारत सरकारला १५ मार्चपर्यंत सर्व सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. भारतातील चित्रपट उद्योगाने मालदीववर बहिष्कार घालावा, तिथे चित्रीकरण करू नका, तिथे सुटी साजरी करण्यासाठी जाऊ नये. जो कोणी आमच्या विरोधात उभा राहील त्याच्या विरोधात आपण उभे राहूया, असे आवाहन सुरेश श्यामलाल यांनी केले आहे.

१० जानेवारी २०२४ या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज्’ या संघटनेने मालदीवमधील चित्रीकरणाला विरोध केला होता.