आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळेच्या समर्थनार्थ निघणार्‍या मोर्चास पोलिसांनी अनुमती देऊ नये ! – सकल हिंदु समाजाची मागणी

आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद असून त्यांची पत्नी अद्याप पसार आहे. त्यांची संपत्ती, तसेच गेल्या १० वर्षांत केलेल्या कारभाराचे अन्वेषण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली आहे.

ऑस्ट्रेलियातील गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तानच्या मागणीसाठी सार्वमत घेण्याविषयी भित्तीपत्रके चिकटवली !

खलिस्तानी आतंकवाद कॅनडा, अमेरिका आदी देशांत फोफाववला असतांना भारत सरकारने तो नष्ट करण्यासाठी काहीही पावले न उचलल्यामुळे तो आज जगात फोफावत आहे.

न्यायालयात न जाता शेतभूमी आणि वहिवाट यांतील वाद सुटण्यासाठी राज्यशासनाची ‘सलोखा योजना’ घोषित !

शेतभूमीच्या मालकी हक्काविषयीचे वाद, रस्त्याचे वाद, शासकीय अभिलेखातील चुकीच्या नोंदणीमुळे होणारे वाद, शेतीवरील अतिक्रमण, भावकींमधील वाद मिटण्यासाठी राज्यशासनाने ‘सलोखा योजना’ घोषित केली आहे.

वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !

वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.

पंतप्रधान मोदी यांची २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथील तालकटोरा मैदान येथे २७ जानेवारी या दिवशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने ट्वीट करून दिली.

जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांच्या १८ अतिरिक्त तुकड्या नियुक्त करणार !

जिहादी आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असणार्‍या पाकला जोपर्यंत नष्ट करणार नाही, तोपर्यंत केवळ काश्मीरच नव्हे, तर भारतात जिहादी आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे नागरिकांच्या रक्षणासाठी अतिरिक्त सैनिकांची नियुक्ती करण्यासाठी पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना नष्ट करणे आवश्यक !

सध्याचा काळ धोकादायक आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

जर जगात एकच शक्तीचे वर्चस्व निर्माण झाले, तर कोणतेही क्षेत्र स्थिर होणार नाही, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.

एक्सप्रेस रेल्वेगाडीला ३ घंटे उशीर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार !

एक्स्प्रेस रेल्वेगाडीने प्रवास करतांना गाडीला ३ घंटे उशीर होत असेल, तर तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार आहेत. एवढेच नाही, तर अल्पाहार आणि जेवण हेही विनामूल्य मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी केली आहे.