झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

रांची (झारखंड) – झारखंड राज्यात ३ जानेवारी या दिवशी २ ट्रकमधून हत्येसाठी नेणार्‍या ४८ गोवंशांना वाचवण्यात आले. या प्रकरणी लालू कुमार यादव आणि महंमद करीम यांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य ६ जण पळून गेले आहेत.

बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.