वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !

पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांचा अहवालातील निष्कर्ष !

मुंबई – वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.

१. नवी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मागील ३-४ दिवसांपासून ३३० हून अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार झाले आहेत. कल्याण आणि ठाणे येथेही हवेची गुणवत्ता खालावली आहे.

२. हवेच्या गुणवत्तेचा एक्यूआय ० ते ५० इतका असल्यास तो आरोग्यदायी असतो. ५० ते १०० एक्यूआय प्रदूषित मानला जातो. १०० ते २०० एक्यूआय असल्यास हृदयविकार, दमाविकार असलेल्यांना त्रास होतो. २०० च्या वर असल्यास आरोग्यास हानीकारक ठरू शकते.

३. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, मोठ्या प्रमाणात चालू असलेली बांधकामे, मेट्रोची कामे, तसेच धुलीकण यांमुळे प्रदूषणात आणखीन वाढ होऊ शकते.

संपादकीय भूमिका

  • वर्षभरातील अध्र्याहून अधिक दिवस मुंबईकर प्रदूषित वातावरणात रहात असणे हे धोकादायक !
  • मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !