पंतप्रधान मोदी यांची २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथील तालकटोरा मैदान येथे २७ जानेवारी या दिवशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने ट्वीट करून दिली. यापूर्वी, म्हणजे १६ फेब्रुवारी २०१८ या दिवशी याच ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम झाला होता.