बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी !

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या केल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

कोलकाता – बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या नंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत हिंसाचार केला. नंदीग्राम येथील भाजपचे कार्यकर्ते देबव्रत मैती यांची हत्या केल्याच्या प्रकरणात हलदिया न्यायालयाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ४ नेत्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआयकडून) चौकशी करण्यात आली होती. अबू ताहेर, शेख कुशोबी, शेख अमानतुल्ला, शेख सुफियान अशी अटक वॉरंट जारी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांतील शेख अमानतुल्ला हा नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘निवडणूक एजंट’ म्हणून कार्यरत होता.

केंद्रीय अन्वेषण विभागाने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रामध्ये शेख सैय्याम काझी आणि शेख शमसुद्देह यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयने १२ जणांना अटक केली आहे. मे २०२१ मध्ये बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसर्‍या दिवशी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देबव्रत मैती यांच्यावर आक्रमण केले होते. रुग्णालयात उपचार घेतांना त्यांना मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

  • गुंडांचा भरणा असणारा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? हा पक्ष लोकशाहीला कलंक असून त्याच्यावर बंदी घालणे आवश्यक !