मुंबई – गाडीतून ७ जण रायफल घेऊन जात असल्याचा दूरभाष मुंबई पोलिसांना आला होता; पण पडताळणीअंती त्यात तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. पोलीस नियंत्रण कक्षाला दूरभाष करून खोटी माहिती देणार्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी आणि खोटी माहिती देणारे १०० हून अधिक संदेश किंवा संपर्क आले आहेत, असे एका अधिकार्याने सांगितले. (सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण शक्ती पणाला लावावी लागत असूनही निष्पन्न काहीच होत नाही. पोलीस अधिकार्यांची ऊर्जा अशा प्रकरणांत विनाकारण व्यय होत असतांना यावर आतापर्यंत ठोस उपाय का काढला नाही ? पोलिसांना वर्षभर अशा घटनांना सामोरे जावे लागणे दुर्दैवी आहे ! – संपादक)