याआधीही विनयभंगाचे २ गुन्हे नोंद
मुंबई – फटाक्यांचे आमीष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करणार्या ३२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. येथील अँटॉप हिल परिसरात ही घटना घडली. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही आरोपीने मुलाला दिली होती. विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती केल्याप्रकरणी आरोपीविरोधात यापूर्वी दोन गुन्हे नोंद आहेत. (गुन्हे नोंद आहेत, तर अद्याप शिक्षा का झाली नाही ? कारवाईतील दिरंगाईमुळेच आरोपी वारंवार गुन्हे करण्यास धजावतात – संपादक)