ऐरोली येथे गोवंशियांच्‍या मांसाची वाहतूक करणार्‍या धर्मांधाला अटक

(प्रतिकात्मक चित्र)

नवी मुंबई, १६ नोव्‍हेंबर (वार्ता.) – नाशिकहून मुंबईमध्‍ये अवैधरित्‍या गोवंशियांच्‍या मांसाची वाहतूक होणार असल्‍याची माहिती प्राणी कल्‍याण अधिकारी आशिष बारीक यांनी रबाळे पोलिसांना दिली होती. त्‍यानंतर पोलीस आणि गोरक्षक यांनी सापळा रचून मांसाची वाहतूक करणारा ट्रक ऐरोली नाका येथे कह्यात घेतला. या प्रकरणी आरोपी जहीर इस्‍माईल कुरेशी याला अटक करण्‍यात आली आहे. हे मांस विक्रीसाठी नेत असल्‍याचे कुरेशी याने मान्‍य केले. ट्रक आणि त्‍यातील माल असा एकूण ११ लाख रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्‍त केला आहे.

वरिष्‍ठ प्राणी कल्‍याण अधिकारी यतींद्र जैन यांसह त्‍यांचे सहकारी दीपक देढे, नवनाथ पाटील, मयूर भानुशाली यांचेही साहाय्‍य लाभले.

संपादकीय भूमिका :

गोवंशियांच्‍या हत्‍येस बंदी असतांना उघडपणे त्‍यांची हत्‍या करून मांस विक्रीसाठी नेणे यातूनच धर्मांधांना कायद्याचा धाक उरला नसल्‍याचे दिसून येते !