
लातूर – विवाहितेचे शारीरिक शोषण करणार्या मौलानाच्या विरोधात येथील विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी मौलाना संबंधित २२ वर्षीय पीडितेवर मागील १० वर्षांपासून अत्याचार करत होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी त्याला चोप दिला. मौलाना इस्माईल करीम शेख तथा मौलाना कासीम (वय ७० वर्षे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (वासनांध मौलानावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
१. पीडित महिलेने मौलानाच्या त्रासातून सुटका होण्यासाठी, तसेच त्याला पुराव्यांसह पकडण्यासाठी एक व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर समाजातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
२. लातूर जिल्ह्यात संबंधित मौलानाच्या अनेक ठिकाणी संस्था आहेत. याच ठिकाणी वयाच्या अकराव्या वर्षापासून शिक्षण घेणार्या पीडितेवर या मौलानाची वाईट दृष्टी होती. तेव्हापासूनत्याने पीडितेचे सातत्याने शारीरिक शोषण केले.
संपादकीय भूमिका :मौलानांकडून होणार्या लैंगिक अत्याचाराविरोधात वृत्तवाहिन्या कधी चर्चासत्रांचे आयोजन करत नाहीत, हे लक्षात घ्या ! |
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !