नवी मुंबईची पहिली मेट्रो आजपासून धावणार !

नवी मुंबई – उद़्‍घाटन न करता बेलापूर ते पेंधर मार्गावर नवी मुंबईची पहिली मेट्रो १७ नोव्‍हेंबरपासून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते या मेट्रोच्‍या मार्गिकेचे उद़्‍घाटन करण्‍यात येणार होते; पण आता मुख्‍यमंत्री शिंदे यांच्‍या आदेशानंतर ही चालू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

कोणत्‍या स्‍थानकांचा समावेश असेल ? 

१. यामध्‍ये सीबीडी-बेलापूर, सेक्‍टर ७, सिडको सायन्‍स पार्क, उत्‍सव चौक, खारघर सेक्‍टर ११, खारघर, सेक्‍टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्‍टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्‍थानके आहेत.

२. मेट्रोची ही मार्गिका नवी मुंबईच्‍या अंतर्गत भागातून जाते. त्‍यामुळे या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसरालाही लाभ होईल.

३. तळोजा औद्योगिक वसाहत आणि कळंबोलीची स्‍टीलची बाजारपेठ या दृष्‍टीनेही मेट्रो सर्वांसाठी लाभदायक ठरेल.