गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षिकेने ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना रोखले !

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने कोणती हानी होते ?’, हे कुणी सांगेल का ? श्रीरामाच्या जीवनाचा आदर्श देशातील प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे असतांना त्याच्या नावालाही विरोध होणे, हे लज्जास्पद !

मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

‘हिंदुद्वेष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनां‍वरील दडपशाही म्हणजे धर्मनिरपेक्षता’ अशी व्याख्या देशात तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी केली आहे. यावरच न्यायालयाने कोरडे ओढणे म्हणजे सोनाराने कान टोचणे होय !

Pakistan Zindabad ? : पाक-ऑस्ट्रेलिया सामन्यात पाक समर्थकाला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यावरून मज्जाव !

बेंगळुरू पोलिसांचे स्तुत्य कृत्य !

Supreme Court : नाल्यांची स्वच्छता करतांना मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांची हानीभरपाई द्या !

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश

INS Imphal : स्वदेशी बनावटीची ‘आय.एन्.एस्. इंफाळ’ युद्धनौका ४ महिन्यांपूर्वीच नौदलाला सुपुर्द !

ब्रह्मोस आणि बराक क्षेपणास्त्रे सुसज्ज
मुंबईतील ‘माझगाव डॉकशिप बिल्डर्स लिमिटेड’ने बांधली !

ISRO Gaganyaan : ‘इस्रो’च्या ‘गगनयान’ मोहिमेतील महत्त्वाची चाचणी यशस्वी !

तांत्रिक बिघाडानंतर काही मिनिटांतच अवकाश यानाच्या आपातकालीन सुटकेची करण्यात आली चाचणी !

विद्यार्थ्याच्या हत्या प्रकरणातील मकोकाचे आरोपी निर्दोष 

डोंबिवली येथील १४ वर्षीय मुलाचे १५ वर्षांपूर्वी शाळेत जातांना खंडणीसाठी अपहरण करून त्याला जंगलात ठार मारले होते. या प्रकरणी अटकेतील ४ आरोपींची मकोका न्यायालयाने आरोपातून निर्दोष सुटका केली.

क्रिकेट सामन्याच्यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्‍यांना अटक !

१ सहस्र २०० रुपयांचे तिकिट १२ सहस्र रुपयांना विक्री करणार्‍या रवि देवकर आणि अजित कदम या दलालांना अटक केली. त्यांना युनूस शेख याने तिकिटे पुरवली. या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. 

चरस विक्री करणारा अटकेत ! 

तुर्भे भागात चरस विक्री करणार्‍या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे १ किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले. संजीव प्रकाश पाटील असे त्याचे नाव आहे.

दांडियाचा बनावट पास बनवणार्‍या तिघांवर गुन्हा नोंद ! 

बोरिवली भागातील तिघांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट पासचा वापर केला. ३०० रुपयांचा बनावट पास बनवल्याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.