नवी मुंबई – तुर्भे भागात चरस विक्री करणार्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे १ किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले. संजीव प्रकाश पाटील असे त्याचे नाव आहे. चरससह दुचाकी, भ्रमणभाष आणि काही रोख रक्कम असा एकूण ५ लाख ९२ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.