Pakistan Zindabad ? : पाक-ऑस्ट्रेलिया सामन्यात पाक समर्थकाला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यावरून मज्जाव !

  • बेंगळुरू पोलिसांचे स्तुत्य कृत्य !

  • ‘भारत आंतरराष्ट्रीय खेळ आयोजित करण्याच्या योग्यतेचा नाही’, अशा प्रकारे धर्मनिरपेक्षतावाद्यांची गरळओक !

बेंगळुरू – २० ऑक्टोबर या दिवशी बेंगळुरूमध्ये पाक-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या वेळी वाद झाला. एका पाक समर्थकाने मैदानात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावर बेंगळुरू पोलिसांनी पाक समर्थकाला असे न करण्याची समज दिली. यावर त्याने पोलिसाशी हुज्जत घातली. पाकसमर्थक म्हणाला, ‘पाक-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना चालू असतांना प्रेक्षकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या; मग आम्ही ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा का देऊ शकत नाही ?’ यावर पोलीस कर्मचार्‍याने म्हटले की, ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली जाऊ शकते, पण ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नाही ! या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असून पाकप्रेमी भारतीय याला विरोध करत आहेत.

१४ ऑक्टोबर या दिवशी भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे तक्रार प्रविष्ट केली होती. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतत असतांना काही प्रेक्षकांनी ‘जय श्रीराम’च्या  घोेषणा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे बेंगळुरूतही ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाला धूळ चारली.

संपादकीय भूमिका

  • ‘भारताची योग्यता काय आहे आणि काय नाही’, हे सांगण्याची योग्यतातरी या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांची आहे का ? आज त्यांची योग्यता काय आहे, हे लोकशाही भारताने त्यांना घरी बसवून दाखवून दिले आहे, हेच खरे !
  • भारतीय खेळाडूंना गेल्या ४० वर्षांत पाकिस्तानमध्ये हिंदू असल्यावरून अत्यंत अन्याय्य आणि अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. त्यामुळे ‘गांधीगिरी’ करण्यापेक्षा भारतद्वेष नसानसांत भिनलेल्या पाकिस्तान्यांना अथवा भारतातील पाकप्रेमींना त्यांची जागा दाखवण्यात काहीच अयोग्य नाही, हे लक्षात ठेवा !