‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

‘शिवशौर्य यात्रे’च्‍या माध्‍यमातून तरुणांमध्‍ये शौर्य जागृतीचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या राज्‍याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘मुंबई पोर्ट ट्रस्‍ट’च्‍या जागेवरील शेकडो इमारतींच्‍या नूतनीकरणाची कामे मार्गी लावू !

कुलाबा, भायखळा, शिवडी, वडाळा, ट्राँबे, चेंबूर हा भाग मुंबई पोर्ट ट्रस्‍टच्‍या अखत्‍यारित येतो. या भागांतील अनेक इमारती पडण्‍याच्‍या स्‍थितीत आहेत; मात्र नूतनीकरणाची अनुमती नसल्‍यामुळे त्‍यांची दुरुस्‍ती रखडली आहे. प्रतीवर्षी या भागातील ८ ते १० इमारती पडतात.

मोखाडा येथे भरदिवसा गळा चिरून विद्यार्थिनीची हत्‍या !

मोखाडा येथे महाविद्यालयामध्‍ये शिकणार्‍या एका विद्यार्थिनीची भरदिवसा गळा चिरून प्रभाकर वाघेरे याने हत्‍या केली. अर्चना वधर असे या मृत मुलीचे नाव आहे. या हत्‍येनंतर फरार झालेल्‍या आरोपीला पकडण्‍यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. 

हिंदूंनो, ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे जाणा !

काळानुरूप हिंदूंनी एकजुटीने काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आणले. यावरून हिंदूंनो, आपल्या एकीचे बळ जाणा ! केवळ सत्तापालटापुरते नाही, तर ‘अहोरात्र संघटित रहाणे, ही काळाची आवश्यकता आहे’, याचाही बोध घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे पार पडला !

गरवारे महाविद्यालयाच्‍या जवळील ‘कोहिनूर मंगल कार्यालय’, कर्वे रोड येथे ८ ऑक्‍टोबर या दिवशी डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्‍या ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

सनातन धर्म नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍यांच्‍या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्‍छेद हेच ध्‍येय ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

महाराष्‍ट्रातील सनातनधर्मीय हिंदु समाजाने सजग होण्‍याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍यांचा प्रतिवाद करण्‍याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत !

हिंदु देवतांची पोस्‍ट सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार्‍या मुसलमान युवकाचे अन्‍वेषण करावे, अटक केलेल्‍या निष्‍पाप हिंदु तरुणांवरील गुन्‍हे मागे घेण्‍यात यावेत, या तसेच विविध मागण्‍यांसाठी सकल हिंदु समाज सांगली जिल्‍ह्याच्‍या वतीने ‘आक्रोश हिंदू संयमाचा’ या नावाने धरणे आंदोलन करण्‍यात आले.

मालेगाव न्‍यायालयात खासदार संजय राऊत यांच्‍यावर अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट !

‘वृत्तपत्रातून चुकीची आणि अपर्कीतीकारक माहिती प्रसिद्ध करण्‍यात आली आहे’, असा आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्‍यावर मालेगाव येथील अतिरिक्‍त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी यांच्‍या न्‍यायालयात अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट केला आहे.

अनधिकृतपणे वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस

पोलिसांनी अमली पदार्थ बाळगणार्‍यांच्‍या विरुद्धच्‍या मोहिमेमध्‍ये उलवे येथे रहाणार्‍या नायजेरियन नागरिकांवर कारवाई केली आहे. यामध्‍ये अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या १४ जणांना भारत सोडण्‍याची नोटीस बजावली आहे.

घाटकोपर येथील गुजराती भाषेतील फलक तोडला !

मराठीबहुल महाराष्‍ट्रात सर्वच फलक किंवा नावांच्‍या पाट्या मराठीत असायला हव्‍यात !