हादग्‍यासारख्‍या परंपरा जतन करणे अत्‍यावश्‍यक ! – सौ. संगीता खोत, माजी महापौर

हस्‍त नक्षत्राचा प्रारंभ होतो, त्‍या दिवसापासून हादग्‍याचा प्रारंभ होतो. पहिल्‍या दिवशी हत्तीचे चित्र भिंतीवर लावून त्‍याला हादग्‍याच्‍या फुलांची माळ आणि १६ प्रकारच्‍या फळांची माळ घालण्‍यात येते.

महिलांनी तोकड्या कपड्यांत नृत्‍य करणे अश्‍लीलता नाही ! – नागपूर खंडपिठाचा निर्वाळा

महिलांनी तोकड्या कपड्यांत नृत्‍य किंवा हातवारे करण्‍याला अश्‍लीलता म्‍हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपिठाने १३ ऑक्‍टोबर या दिवशी एका प्रकरणात सुनावणी करतांना दिला.

सुळकूड पाणी योजनेच्‍या कार्यवाहीसाठी इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे लाक्षणिक उपोषण !

सुळकूड पाणी योजनेच्‍या कार्यवाहीसाठी ‘इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती’च्‍या वतीने १३ ऑक्‍टोबरला म. गांधी पुतळ्‍याजवळ लाक्षणिक उपोषण करण्‍यात आले.

महापालिकेच्‍या शाळेत २ शिक्षिकांनी स्‍वत:च्‍या जागेवर परस्‍पर इतर महिलांची नियुक्‍ती केली !

महापालिकेच्‍या येथील जुना बाजार आणि समतानगरमधील शाळांमध्‍ये विद्यार्थ्‍यांना शिकवण्‍यासाठी शाळांतील शिक्षिकांनी परस्‍पर इतर महिलांची नियुक्‍ती केली आहे.

३ वर्षांच्‍या मुलीवर लैंगिक अत्‍याचार !

लपाछपी खेळण्‍याच्‍या बहाण्‍याने तीन वर्षांच्‍या मुलीला बोलावून तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करणार्‍या १५ वर्षांच्‍या मुलाविरोधात आरे पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे. आरोपी मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी करण्‍यात आली आहे.

ठाणे येथे १८ लाख रुपयांचा गुटखा जप्‍त करून एकाला अटक

गुजरात येथून आलेल्‍या गुटख्‍याची महाराष्‍ट्रात तस्‍करी करणार्‍या मंजितकुमार गांगो राय याला खारेगाव टोलनाका येथे सापळा रचून कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट विदेशी मद्याचा साठा जप्‍त !

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्‍या भरारी पथकाने कराड-चिपळूण मार्गावरील गोषटवाडी येथे कारवाई केली.

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता केली रहित !

रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन करत ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’, ‘खेरसॉन’, ‘लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक’ आणि ‘जापोरिजीया’ या क्षेत्रांना प्रांतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता दिली. हे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे.

जितेंद्र आव्हाड आणि निखिल वागळे यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्ननिष्ठांची पोलिसांकडे मागणी

‘आव्हाड आणि वागळे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी त्वरित गुन्हे नोंदवावेत’, अशी मागणी करण्यात आली. पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?