अमरावती, १ सप्टेंबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते; परंतु त्यांच्या विरोधकांकडून त्या अर्जांना माफीचे ‘मर्सी पिटिशन’ (दयेची याचिका) म्हणून प्रस्तुत केले जात आहे. सावरकरांनी जे काही केले, ते देशासाठीच केले, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर यांनी केले ते अमरावती येथे आले असतांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी, तसेच धर्मप्रेमी यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ‘वीर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात खटला प्रविष्ट झाला आहे. ‘५-६ मासांत राहुल गांधी यांना भोईवाडा न्यायालयात उपस्थित रहावे लागेल’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे श्री. स्वप्नील सावरकर या वेळी उपस्थित होते.
या वेळी श्री. रणजित सावरकर म्हणाले…
१. जगातील सर्व विचारांचा समावेश असलेले अत्यंत प्रगल्भ असे आमचे हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. आमच्या देशाचे रक्षण करणे हे आमचे दायित्व आणि अधिकार आहे.
२. हा देश जर आमच्या हातातून गेला, तर आम्हाला जगात जागा नाही. पुढील ५ ते १० वर्षांत ती वेळ येणारच आहे. दारूल इस्लामचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला राजकीय अस्थिर करून भारताची अर्थसत्ता मिळवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
३. भारताची हानी करून मिळणार्या पैशांचा उपयोग विविध प्रकारच्या जिहादसाठी आणि आतंकवादासाठी केला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी सक्रीय होणे महत्त्वाचे आहे.
४. माझ्या पैशांचा वापर माझ्याच समाजासाठी व्हावा; म्हणून सगळ्यांनी विशेषतः महिलांनी पुढाकार घ्यावा. आपल्या मुलांना तसे समजून सांगावे.
५. देशात हिंदुहिताचेच सरकार येणार आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून हिंदूंनी एकत्र यायला हवे.
हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवौद्गार !
हिंदु जनजागृती समिती ही प्रामाणिकपणे धर्मकार्य आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने कार्य करणारी संघटना आहे. कुठल्याही राजकीय उद्देशाने समिती कार्य करत नाही. सर्व संघटनांनी हिंदु जनजागृती समिती समवेत एकत्र येऊन कार्य करावे. |