महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अपव्यवहार प्रकरण
मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या अपव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पुरवणी आरोपपत्रात १४ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते रणजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यासह अरविंद खोतकर, सुभाष देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे. शिवसेनेच्या एका नेत्याचे नावही आरोपपत्रात आहे; मात्र यातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांची नावे वगळण्यात आली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार अन् सुनेत्रा पवार यांची नावे वगळली !
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरण, आरोपपत्रात प्राजक्त तनपुरेंचं नाव#bank #AjitPawar #ed #maharashtracooperativebank #prajakttanpurehttps://t.co/Lb0Os0laUV
— ABP माझा (@abpmajhatv) September 1, 2023
१. ‘ईडी’च्या अधिकार्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला असला, तरी ‘कुणाचा सहभाग असल्यावर पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट करता येऊ शकते’, असे सांगितले आहे. यापूर्वी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात ‘ईडी’ने ६५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली होती. असे असतांनाही आरोपपत्रातून अजित पवार यांचे नाव वगळण्यात आले आहे.
२. सावनेर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी ३२ लाख रुपये असतांना तो कारखाना अवघ्या १२ कोटी ९५ लाख रुपयांत ‘प्रसाद शुगर ॲण्ड अलाईड ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड’ आस्थापनाला विकण्यात आला आहे.
३. ‘दोन्ही प्रकरणे सारखी असतांना समवेत आलेल्यांना एक न्याय आणि दुसर्याला दुसरा न्याय दिला जात आहे’, असा आरोप विरोधक करत आहेत. राज्य सहकारी बँकेने नियमांचे पालन न करता ‘राम गणेश गडकरी साखर कारखान्या’ची विक्री केल्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्ये येथील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला होता.