
मुंबई – शिवसेनेचे घाटकोपर येथील माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी लोकलगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार या स्थानकांच्या मधल्या मार्गावर हा प्रकार घडला. ३१ ऑगस्टच्या रात्री मोरे यांचा मृतदेह रेल्वेमार्गावर सापडला. रात्री ११.३० वाजता मोटरमनला ट्रॅकवर कुणीतरी झोपले असल्याचे आढळले. त्याने ट्रेनचा वेग अल्पही केला; मात्र तोपर्यंत ट्रेन मोरे यांच्या अंगावरून गेली. सुधीर मोरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख म्हणूनही काम केले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटासमवेत राहिले.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !