पेठ शिवापूर (तालुका पाटण) येथील अनधिकृत मदरशाचे बांधकाम तात्काळ बंद करावे ! – महिंद ग्रामस्थांची मागणी

प्रतिकात्मक चित्र

सातारा, १ सप्टेंबर (वार्ता.) – पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील पेठ शिवापूर येथे अनधिकृत मदरशाचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी महिंद ग्रामपंचायत आणि महिंद ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, पेठ शिवापूर येथील मुसलमानांची संख्या पहाता एवढा मोठा मदरसा आणि त्यामध्ये रहायला येणारे परप्रांतीय मुसलमान ही पाटण तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. पाटण तालुक्यातील विहे गावातील एका मुसलमान युवकाने पाकिस्तानशी हातमिळवणी केली असून त्याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे, तसेच कराड येथील अभियांत्रिकी शिक्षण घेणारा विद्यार्थी आतंकवादी संघटनेच्या कार्यामध्ये सहभागी असून त्याने युवकांना देशविरोधी कारवायांमध्ये गुंतवले आहे. याच मदरशात एखादा अतिरेकी येऊन दडून बसू शकतो आणि देशभक्त मुसलमानांना त्याचा त्रास होऊ शकतो, याचा विचार स्थानिक मुसलमानांनी करावा. कोयना धरणाजवळच हा अनधिकृत मदरसा उभा रहात आहे. एखादा अतिरेकी कोयना धरणाबरोबरच कोकणातील अनेक गावांना वेठीस धरून धोक्याची चेतावणी देऊ शकतो. हे टाळण्यासाठी मदरशाचे बांधकाम प्रशासनाने बंद करण्याचे आदेश द्यावेत.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? कि प्रशासनाचा याला पाठिंबा आहे, असा अर्थ काढायचा का ?