मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, कार्य आणि विचार यांचे स्मरण मंत्रालयात १० ऑगस्ट वर्षभर प्रतिदिन होणार आहे. सकाळी १०.४५ वाजता २ ते ३ मिनिटांची ध्वनीफीत सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्या वतीने प्रसारित केली जाणार आहे.