खराब हवामानामुळे मुख्‍यमंत्र्यांचे हेलिकॉप्‍टर माघारी !

एकनाथ शिंदे

मुंबई – मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे १० ऑगस्‍ट या दिवशी हेलिकॉप्‍टरद्वारे सातारा येथील त्‍यांच्‍या दरे या मूळगावी जाणार होते; मात्र खराब हवामानामुळे माघारी घेऊन हेलिकॉप्‍टर मुंबई येथे तातडीने उतरावे (इमर्जन्‍सी लँडिग) लागले. हवामानामध्‍ये सुधारणा झाल्‍यानंतर हेलिकॉप्‍टर पुन्‍हा मार्गस्‍थ झाले.