मुंबई – शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलगा राज सुर्वे यांच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंदुकीच्या धाकावर राजकुमार सिंह या व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी सुर्वे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद आहे. गोरेगाव पूर्व येथील कार्यालयातून बळजोरीने त्यांना उचलून नेण्यात आले. पाटणा येथील व्यावसायिक मनोज मिश्रा यांना दिलेले कर्जाचे प्रकरण मिटवण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आली.